बुधवार, ९ सप्टेंबर, २०१५

नक्की वाचा

�� नक्की वाचा

⚡⚡1) जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
               - नारायण मूर्ती⚡⚡

⚡⚡2)जर तुमच्या कडे दोन  रुपये असतील तर एक रुपयाची रोटी घ्या आणि एक रुपया चे पुस्तक घ्या...
  रोटी तुम्हाला जगण्यास मदत  करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे  कसे ते शिकवेल..
      --डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ⚡⚡

⚡⚡3) यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे, हे मी सांगू
शकणार नाही. पण स्वतःला
ओळखून स्वतःला, स्वतःसाठी,
स्वतःकडून नेमके काय हवे आहे;
हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
             -- विश्वनाथन आनंद⚡⚡

⚡⚡4) नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
              -- धीरूभाई अंबानी⚡⚡

⚡⚡5) पैसा हा खतासारखा आहे.
तो साचवला, की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
             -- जे. आर. डी. टाटा⚡⚡

⚡⚡6) पहिले यश मिळाल नंतर  तुम्ही स्वस्त बसू नका. दुसर्‍या  प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिल यश तुम्हाला केवळ नशीबाने मिळेल....
             -- डाॅ. अब्दुल  कलाम⚡⚡

⚡⚡7) चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.
                      - बिल गेट्स⚡⚡

⚡⚡8) मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ता-यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेला असता.
                 - कल्पना चावला⚡⚡

⚡⚡9) कुणीतरी येऊन बदल घडवतील, याची वाट बघत
बसण्यापेक्षा स्वतःच होणा-या
बदलाचा भाग व्हा.
           -- बराक ओबामा⚡⚡

⚡⚡10) माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ
मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
                -- आयझॅक न्यूटन⚡⚡

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा