तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णा भाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे.अण्णा भाऊंच्या साहित्यात ग्रामीण,दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्चवर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णा भाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांगयांची साहसी जीवनकथा मांडलेली आहे, तर ‘वारणेच्या खो-यात' या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.'कार्यकर्ते लेखक' असं अण्णा भाऊंनाम्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी 'वैजयंता'या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका विषद केली आहे, ती अशी-'जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीचजनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर नि तिच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरली आहे. त्या दलितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने निनिष्ठेने मी चित्रित करणार आहे नि करीत आहे.'अण्णां भाऊंनी लिहिलेली ‘मुंबईची लावणी’ ही त्या काळात खूप गाजली. मुंबईचं विविधांगी रूप, त्या शहरातली गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली विसंगती त्यांनी त्यात टिपली आहे. उदाहरणार्थ,मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।ग्रॅंट रोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।असे किती रोड इथं नाही गणती ।।गल्ली बोळ किती आत । नाक्यांचा नाहीअंत ।अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।आगीनगाडी मोटारगाडी । विमान घेतं उंच उडी ।टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।हातगाडी हमालांची | भारी गडबड खटा-यांची ।धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||३||सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथे एका मातंग कुटुंबात अण्णा भाऊंचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव तुकाराम. त्यांचं कुटुंब अशिक्षित आणि हलाखीच्या परिस्थितीतलं होतं. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. अण्णांचे वडील भाऊ साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते. पण अशा भटक्या जीवनाचा उबग येऊन ते नोकरीसाठी मुंबईला निघून गेले. तिथल्या सुशिक्षित आणि उच्चवर्गीय समाजाचं जीवन बघितल्यानंतर आपल्या मुलांनीही शिक्षण घेऊन असं समृद्ध जीवन जगावं असं त्यांना वाटू लागलं.त्यांच्या सांगण्याप्रमाणे वयाच्या चौदाव्या वर्षी अण्णा भाऊ पहिल्यांदा वाटेगावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली.अण्णा भाऊंच्या बालपणातल्या घडणीमध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळाकरणं हे छंद त्यांना जडले. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्याभोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते.क्रांतिसिंह नाना पाटील यांचं एका जत्रेत ऐकलेलं भाषण हे तरुण अण्णा भाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं. लवकरच अण्णांचे वडील भाऊ साठे यांनी आपलं सगळं कुटुंब मुंबईला हलवलं. सांगलीहून मुंबईला जाताना या संपूर्ण कुटुंबाला बहुतांश प्रवास पायी करावा लागला. यावरून त्यांच्या त्या वेळच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते.मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णा भाऊंसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं मोठं जग त्यांना जवळून पाहायला मिळालं. गरिबी अनुभवलेल्या अण्णा भाऊंची कम्युनिस्ट विचारप्रणालीशी जवळीक झाली. मुळातच कार्यकर्ता व्यक्तिमत्त्वाचे तरुण अण्णा अंगभूत गुणांमुळे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये सहजपणे मिसळून गेले. मुंबईत अण्णा भाऊंनी उदरनिर्वाहासाठी बूटपॉलिश, हमाली, वेटर, घरगडी, कुत्र्याला सांभाळणं, मुलांना खेळवणं, खाण कामगार अशी अनेक प्रकारची कामं केली. या सगळ्यातून त्यांचं अनुभवविश्व घडत गेलं. या शहरात त्यांना आणखी एक छंद जडला तो सिनेमापाहण्याचा. सिनेमाची पोस्टर्स आणि दुकानांवरच्या पाट्या वाचत वाचतच त्यांची साक्षरतेकडे वाटचाल झाली. वडील थकल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. गिरणी कामगार म्हणून काही काळ कोहिनूर मिलमध्ये त्यांनी काम केलं. मात्र लवकरच ती नोकरी सुटली आणि हे सगळं कुटुंब पुन्हा आपल्या गावी परतलं.पण उद्योगी वृत्तीचे अण्णा भाऊ गावात रमले नाहीत. बापू साठे या त्यांच्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते सामील झाले. अण्णा भाऊंना एखाद्या भूमिकेचं आकलन लवकरच आणि चांगलं होत असे. ते ओघवते संवाद उत्तम लिहू शकत. अनेक वाद्यं वाजवण्यात ते तरबेज होते आणि त्यांचं पाठांतरही अतिशय उत्तमहोतं. अण्णांचं हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व तमाशाच्या कलेत खुललं नसतं तरच नवल होतं. त्यांनी तमाशाच्या कलेला लोकनाट्यात रूपांतरित केलं. त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीबद्दल सामान्यांमध्ये जागृती घडवण्याचं मोठं काम पुढे त्यांच्या वगनाट्यांनी केलं. वाटेगावमध्ये असताना वडिलांचं निधन झाल्यानंतर लवकरच अण्णा भाऊंनी कोंडूबाई या अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगाही झाला. मात्र, त्यांच्यासोबतच्या संसारात ते स्थिर झाले नाहीत.'चले जाव' चळवळीतल्या सातारा जिल्ह्यातल्या घडामोडींमध्ये अण्णा भाऊ सहभागी होते. त्यामुळे त्यांच्यावर वॉरंट निघालं आणि त्यांना त्यांचं घर कायमचं सोडावं लागलं. त्यानंतर पुन्हा अण्णांनी भ्रमंती करत मुंबई गाठली. यानंतर तेकम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले आणि पक्षाच्या प्रचारासाठी १९४४ मध्ये त्यांनी लाल बावटा या कलापथकाची स्थापना आपले सहकारी शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर यांच्यासोबत केली. याच काळात अण्णा भाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांचा स्तालिनग्राडचा पोवाडा त्या वेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांच्यातला कलाकार बाहेर आणण्यासाठी हे पथक चांगलंच निमित्त ठरलं.पक्षाच्या कामासाठी फिरताना अण्णा भाऊंचा पुण्यातल्या जयवंताबाई या तरुण विवाहित महिलेशी परिचय झाला. काही कारणाने जयवंताबाई आपल्या पतीबरोबर राहत नसत. पुढे अण्णांनी जयवंताबाईंबरोबर आपला दुसरा विवाह केला. या विवाहामुळे त्यांना बरंच स्थैर्य मिळालं आणि कलानिर्मितीसाठी आवश्यक असलेला कौटुंबिक पाठिंबाही मिळाला.शेवटच्या काळात मात्र त्यांच्या जयवंताबाईंबरोबरच्या नात्याला अनपेक्षितरीत्या ओहोटी लागली आणि जयवंताबाई आपल्या कन्येकडे निघून गेल्या. त्यांच्या जाण्याचा अण्णा भाऊंना धक्का बसला आणि त्यांचं मद्यपान प्रमाणाबाहेर वाढून वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी त्यांना मृत्यू आला.अण्णा भाऊंचं साहित्य-चौदा लोकनाट्यं, 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'फकिरा', 'चित्रा' इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबर्यांसहित सुमारे बत्तीस कादंबर्या आणि बावीसकथासंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. त्यांच्या साहित्याचा हिंदी, सिंधी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ,मल्याळी या प्रादेशिक भाषांबरोबरच रशियन, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच, झेक अशा जगातल्या सत्तावीस भाषांमध्येही अनुवाद झाला.त्यांच्या अनेक कादंबर्यांनी त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीला कथांची रसद पुरवली. 'वैजयंता', 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोंगरची मैना', 'वारणेचा वाघ', 'फकिरा', आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा-कादंबर्यांवर आधारित आहेत.त्यांच्या लोकनाट्यांमध्ये 'अकलेची गोष्ट', 'कलंत्री', 'बेकायदेशीर', 'शेटजीचं इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'देशभक्त घोटाळे', 'लोकमंत्र्यांचा दौरा' इत्यादींचा समावेश आहे.अण्णाभाऊंनी रशियाला जाण्याचा दोनदा अयशस्वी प्रयत्न केला. तिसर्यांदा प्रयत्न केल्यानंतर मात्र त्यांचं रशियाला जाण्याचं नक्की झालं. तेव्हा महाराष्ट्रातूनबरीच आर्थिक मदत त्यांना मिळाली. रशियात अण्णांचं चांगलं स्वागत झालं. त्यावर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिलं.
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५
गाडगेबाबा आणि भटजी
एकदा एका ठीकाणी दशक्रिया विधी चालु असतो .लोक अजुबाजुला
बसलेली असतात .घरचे लोक रडतच मेलेल्या माणसाबद्दल चांगल बोलत असतात .शेजारीच न्हावी वारसाची डोकी भाद्रत असतो .एका पत्रावली वर
चार पाच भाताचे गोळे ठेवलेले असतात.
आणी तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला एकदम मळकट असा दाढी वाढलेला वयस्कर माणुस तिथ येतो आणी भटजी कडे विनवणी करतो की
मला खुप भुक लागली आहे .दोन दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही
माझ्यावर दया करा आणी समोर ठेवलेल्या भाताच्या गोळ्यातिल एक गोळा मला द्या .हे ऐकुन भटजी संतापतो.भटजीच बोलण ऐकुन लोक ही त्या म्हाताऱ्या माणसाच्या अंगावर जातात पण अगदी मळकट लेला आणी भिकारी दिसतोय म्हणुन त्याला हाकलून देतात.
तरी पण तो माणुस परत विनवणी करतो.
आहो दोन दिवस उपाशी आहे धर्म करा आणी एक गोळा द्या या गरिबाला.
त्यावर भटजी म्हणतो यातील एक ही गोळा तुला देता येणार नाही .कारण हा भात म्हणजे जो दहा दिवसापुर्वी मेला आहे त्या साठी त्याला द्यायचा आहे.
म्हातारा तरी ऐकेना
म्हातारा म्हणतो तो माणुस आता कुठे आहे. त्यावर भटजी म्हणतो स्वर्गात. लोक ही तेच बोलतात.
मग म्हातारा म्हणतो
स्वर्ग कुठ आहे.
भटजी म्हणतो खुप लांब आहे आणी हे बोलुन सगळे जण त्या म्हातार्याला हाकलून देतात.
(दशक्रिया विधी नेहमी ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावर करतात मग तो म्हातारा शेजारी असलेल्या नदीच्या पाण्यात उतरतो आणी नदीतील पाणी बाहेरच्या जमीनीवर हाताने फेकतो.
सुरुवातीला कुणी लक्ष देत नाही पण बराच वेळ झाल्यावर भटजी सह सगळे जण विचारतात
ये म्हातार्या आरे काय काय वेड लागलय का काय तुला ?
हे काय करतोय?
त्यावर तो म्हातारा दाढी खाजवत म्हणतो
"बाप्पा हो यंदा दुष्काळ पडलाय आणि शेताला
पाणी नाही म्हणून पाणी देतोय. ..
लोक म्हणतात कुठ आहे शेती तुझी
म्हातारा म्हणतो
अमरावतीला
लोक म्हणतात कुठ आहे
अमरावती?
म्हातारा म्हणतो
खुप लांब आहे अमरावती
लोक आणी भटजी सगळे त्याला हसुन म्हणतात
"आरे वेड्या इथुन टाकलेले पाणी तर इथेच तर पडतय आणी कस तुझ्या शेताला पाणी मिळेल .
यावर म्हातारा म्हणतो
इथ ठेवलेला भात जर मेलेल्या माणसापर्यंत हा
भटजी पोचवत असेल तर
मी टाकलेल पाणी माझ्या
शेताला का मिळणार नाही?
हे ऐकल्यावर सगळे लोक चक्रावून जातात. हा भिकारी नसुन कुणीतरी अवलिया आहे हे मान्य करुन त्या म्हातार्याच्या
पायावर डोकं ठेवतात.
हा म्हातारा दुसरा तिसरा कुणी नसुन अमरावती जिल्ह्य़ातील डेबुजी
झिगंराजी जानोरकर
एकही दिवस शाळेत न
गेलेला महान विज्ञान वादी संत गाडगेबाबा हा होता .वैज्ञानिक विचार करायला शिक्षण लागतेच अस नाही तर आपल्या डोक्यातील
मेंदु गहाण न ठेवता स्वतंत्र असावा लागतो.
म्हणुनच म्हणतो दैववादी होण्या पेक्षा विज्ञान वादी
व्हा नाहीतर पुढच्या पिढ्या या कायमच गुलाम आणी दरिद्री राहतील !!
विचार थोरांचे
ज्या देशातील तरुण केवळ देव धर्मा मागे धावत राहतो ,
त्याला मी केवळ नामर्द हाच शब्द योग्य आहे असे म्हणेन.
स्वतः चे हात पाय चालवता येत नाहीत म्हणून देवापुढे
हात जोडत असलेल्या तरुणाच्या हातात देश गेल्यास तिथे
काहीही साध्य होने शक्य नाही.
- शहीद भगतसिंग.
------------------------------------------------
स्त्रियांची प्रगती ज्याप्रमाणात झाली असेल , त्यावरून
समाजाची प्रगती मी मोजत असतो !!
- विश्वंरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर.
------------------------------------------------
अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ... बेघरांना घर द्यावं....
रंजल्या - गांजल्याची सेवा करावी... मुक्या प्राण्यावर
दया करावी... बापहो देव यांच्यात राहतो... बापहो देव
देवळात राहत नाही... देव आपल्या मनात राहतो...
देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते !!
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते... तेव्हा ते
खूप जवळही असू शकते. जेंव्हा तू प्रतिकुल
परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे
मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल
तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच
माघार घेऊ नकोस... येणारया सर्व आव्हानांसाठी सज्ज
रहा त्यांना खंबीर मनाने सामोरे जा ऐरण झालास तर घाव
सोस... हातोडा झालास तर घाव घाल !!
- माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर.
------------------------------------------------
समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत
आहे ... धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये
आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ
आहेत... ते सर्व परिपाठ
ब्राह्मणांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित
केले आहेत... या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय
होतो विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर
अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित
जनता या रूढींखाली भरडली जाते .
-प्रबोधनकार ठाकरे.
------------------------------------------------
स्वराज्यात जातीपातीला आजिबात थारा नाही .
-छत्रपती शिवराय
------------------------------------------------
बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल
तर जेवणाचे ताट द्या, हातावर भाकरी खा, बायकोले
लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत
घातल्या विना राहु नका.
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
ईश्र्वर एकच व निर्गुण-निराकार आहे...
ईश्र्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज
नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !!
- क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.
------------------------------------------------
"पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती येथील
दलित, कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.''
- साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे.
------------------------------------------------
जातीभेद एक मनाचा रोग आहे . मनाने
तो मानला नाही की , तो झटकन बरा होतो .
- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
------------------------------------------------
बापहो हिन्दू, मुसलमान एकच आहे...
तुमच्या रक्ताचा रंग कसा ?
लोक - 'लाल '.
गाडगेबाबा - देहत्याग केल्यावर या शरीराचे काय होते?
लोक - 'माती'...
गाडगेबाबा - बापहो जे हिन्दूंच्या शरीराचे होते तेच
मुसलमानांच्या शरीराचे होते,
मग हिन्दू आणि मुसलमान यात भेदाभेद कशाला?
- राष्ट्रसंत संत गाडगेबाबा.
------------------------------------------------
सर्वं मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, हे जो पर्यंत
आम्हाला कळत नाहीं, तो पर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप
आपणास कळणार नाहीं. उच्च जाती,नीच जाती ईश्वर्कृत
नाहीं,स्वार्थी मानवाने स्वता:चे रूप व्यक्त
करण्यासाठी आणी त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे
हित व्हावे म्हणून केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे.
- सावित्रीमाई ज्योतिबा फुले.
------------------------------------------------
एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस
वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून
मला मूर्ती पहायला आवडतात. समजू
लागलेल्या वयापासून
माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.
पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास
नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त
सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,
याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.
- पु.लं.देशपांडे('एक शुन्य मी' या पुस्तकातुन)
------------------------------------------------
कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात !
आणि कुठल्याही श्रद्धा डोळस नसतात ! डोळस
श्रद्धा हा वदतोव्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते
तशी श्रद्धा हि आंधळीच असते. मी परमेश्वरावर
श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती श्रद्धा डोळस होत नाही.
ज्या वस्तूच्या (किंवा संकल्पनेच्या)
अस्तित्वाचा कसलाही पुरावा, काही हजार
वर्षांच्या शोधानंतरही उपलब्ध
झालेला नाही त्या वस्तूवरची किंवा संकल्पनेवरची म्हणजे
परमेश्वरावरची श्रद्धा डोळस कशी ? आपल्यावर पिढ्यान
पिढ्या झालेल्या संस्कारांचा परिणाम म्हणून
ती श्रद्धा फार तर प्रामाणिक म्हणता येईल पण डोळस
नव्हेच. भूतपिशाच्च ह्या संकल्पनाच आहेत.
त्याही परमेश्वर ह्या संकल्पनेइतक्याच जुन्या आहेत -
त्यांच्याही अस्तित्वाचा कसलाच नाही. मग
त्या तेवढ्या अंधश्रद्धा,
आणि परमेश्वरावरची श्रद्धा मात्र डोळस श्रद्धा, हे कसे
काय ?
- डॉ. श्रीराम लागू.
------------------------------------------------
"मन सर्वाचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे, मन हे कारण
आहे. मनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार,
माणसाचे शब्द आणि कार्ये हि दृष्ट बनतात, पपोदभाव
दुखे:, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे
जातात त्या प्रमाणे त्याचा पाठपुरावा करत असतात. मन
हे सर्वाचे मूळ आहे, तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडून
आणते. मनात सदवीचार असतील तर, त्या माणसाचे शब्द
आणि कार्ये दोन्ही हि चांगली असतात
आणि अश्या सदाचारातून उद्भभवनारे सुख
सावली प्रमाणे सदोदित त्या माणसा मागे जात असते".
- तथागत गौतम बुद्ध.
------------------------------------------------
सर्व
प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार
नष्ट करा.
- नेताजी सुभाषचंद्र बोस.
------------------------------------------------
अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी,
कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल,
फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक
भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार
धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात,
ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले,
आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.
- डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर.
------------------------------------------------
परिवर्तनाची प्रक्रिया हि एक सुंदर तपश्चर्या आहे असे
मला वाटते. आपणही तपश्चर्या निष्ठेने, विवेकाने, संयमाने,
परस्पर विश्वासाने, परस्पर सहायाने करू
या परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने
आधी चांगला माणूस कसे बनायचे ते शिकले पाहिजे
आणि तसे बनले पाहिजे, असे मी मानतो. जे
हि प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्या पुढे
मी नतमस्तक आहे.
-डॉ.आ.ह.साळुंखे.
------------------------------------------------
कृतीशिवाय उपदेश करणे हे मूर्खांचे लक्षण होय.
तो कृतीशून्य वागत असेल तर...
रात्रंदिवस केलेले उपदेश उपयोगी पडत नाही.
-संत कबीर.
------------------------------------------------
"शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे
इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम
मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.
म्हणूनच सक्तीच्या व मोफत
शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे."
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज.
------------------------------------------------
जब पड़ोसी भूखा हो तब मंदिर में भोग चढ़ाना पुण्य
नहीं पाप है !
- स्वामी विवेकानंद
------------------------------------------------
प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त। बाकीचें
झंजट फालतू । समजतों आम्ही ॥
दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।
सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥
लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे ॥
पैश्या साठी कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
------------------------------------------------
असत्याच्या बाजूने जरी बहुमत असले तरी ते स्विकारू नये.
- संत तुकोबाराय.
------------------------------------------------
हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून ते स्वतः जगतात व
इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार
चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते.
ती जगतात आणि जगवतात !!
- सत्यशोधक विचारवंत आण्णा भाऊ साठे.
------------------------------------------------
शेतकरी माय-बाप हो... जगाचा पोशिंदा म्हणून
तुमची ओळख आहे... एका दाण्याचे शंभर दाणे
करण्याची किमया तुमच्यातच आहे , म्हणून
म्हणतो जरा धीराने घ्या... एकाचे शंभर आणि शंभराचे
कोटी होतील... असे करता करता सर्व कर्ज
निकाली निघेल... आत्महत्या हा कोणत्याही संकटावरील
पर्याय होऊ शकत नाही... बाबांनो जे बाजारात विकते ,
तेच पिकवा..'
- प्रबोधनकार सत्यपाल महाराज.
------------------------------------------------
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा.
एक दिवस तुमचाही उजाडेल.
- सिंधुताई सपकाळ.
------------------------------------------------