" ज्याचा भरोसा देवावर,
त्याच्या थुंकावे नावावर...
त्याचं वाळीत टाका घर,
जिथे दिसत नाही आंबेडकर...
भाषणाच्या नुसत्या डागतो तोफा,
पण काळू आईला घालतोय खेपा...
धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा,
पण घरात बसवतो गणपती बाप्पा...
काय कामाचा आहेस नर,
तू असून पदवीधर...
त्याचं वाळीत टाका घर,
जिथे दिसत नाही आंबेडकर...
ठोकून छाती हा जयभिम करतो,
पण कोंबडी, बकरा देवाला कापतो...
आणि आपल्या जाऊन गावावर,
घालून खंडोबाचा जागर...
त्याचं वाळीत टाका घर,
जिथे दिसत नाही आंबेडकर...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा