सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

बुध्द वंदना

बुद्ध वंदना : मराठीअरहंत सम्यक सम्बुद्ध भगवान अशा बुद्ध भगवंतास मी अभिवादन करतो.त्या बुद्ध भगवंतांनी उपदेशिलेल्या धम्मास मी नमस्कार करतो.सन्मार्गावर आरुढ झालेल्या भगवंतांच्या श्रावक संघास मी नमस्कार करतो.त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.त्या भगवान अरहंत सम्यक सम्बुद्धास माझा नमस्कार असो.त्रिशरणमी बुद्धाला शरण जातो.मी धमाला शरण जातोमी संघाला शरण जातो.दुसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.दुसऱ्यांदा मी धमाला शरण जातोदुसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जातो.तिसऱ्यांदा मी धमाला शरण जातोतिसऱ्यांदा मी संघाला शरण जातो.पंचशीलमी जीवहिंसेपासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.मी चोरी करण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.मी कामवासनेच्या दुराचारापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो.मी मद्य, तसेच इतर मादक पदार्थांच्या सेवनापासुन अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा